लॉकडाउनच्या या काळात कुटुंबासोबत जास्ती जास्त वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. त्यातच अभिनेत्री किशोरी शहाणे या संधीचं सोनं करत आहेत. सध्या त्या त्यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. या फार्म हाऊसमध्येच छोटसं जीमदेखील असल्याने तिथेही त्या वर्कआउट करत आहेत. त्या घरच्या बागेत उगवलेल्या भाज्यांचाही आस्वाद त्या घेत आहेत.
किशोरी शहाणे या काळात तिथेच कुकिंग करत आहेत, वर्कआउटही करत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत त्यांच्या आगामी सिनेमांविषयीही सांगीतलं. बऱ्याच वर्षांनी त्या अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत दिसणार आहेत. याविषयीही त्या बोलल्या.